महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कंगना रनौतचा 'धाक्कड' लूक, पहिलं पोस्टर प्रदर्शित - first look

यावर्षी कंगनाचा 'मणिकर्णिका' चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. आता तिचा 'जजमेंटल है क्या' हा चित्रपटदेखील प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटानंतर 'धाक्कड' चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसेल.

कंगना रनौतचा 'धाक्कड' लूक, पहिलं पोस्टर प्रदर्शित

By

Published : Jul 6, 2019, 10:22 AM IST

मुंबई - बॉलिवूडची 'क्विन' अशी ओळख असणारी कंगना रनौत आपल्या आगामी 'जजमेंटल है क्या' या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. प्रकाश कोवेमालुदी यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट तयार होत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत राजकुमार राव हादेखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय कंगना आणखी एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती आहे. 'धाक्कड' असे तिच्या पुढच्या चित्रपटाचे नाव असणार आहे. या चित्रपटाचे फर्स्ट पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.

कंगनाचा यावर्षी 'मणिकर्णिका' चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. आता तिचा 'जजमेंटल है क्या' हा चित्रपटदेखील प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटानंतर 'धाक्कड' चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसेल.

कंगना रनौतचा 'धाक्कड' लूक, पहिलं पोस्टर प्रदर्शित

एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, 'धाक्कड' हा एक अॅक्शन चित्रपट असणार आहे. अनेक विदेशी लोकेशन्सवर हा चित्रपट शूट करण्यात येणार आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये कंगनाचा पाठमोरा लूक पाहायला मिळतोय.

दिग्दर्शक रजनीश घई हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर, सोहेल माकलाई हे निर्मिती करत आहेत. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल.

कंगनाच्या हाती यावर्षी बरेचसे चित्रपट आहे. अश्विनी अय्यर तिवारी यांच्या 'पंगा' चित्रपटातही ती झळकणार आहे. हा चित्रपट कबड्डीवर आधारित आहे. याशिवाय ती जयललिता यांच्या बायोपिकमध्येही दिसणार आहे. सप्टेंबर महिन्यात या चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details