महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

देशाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांचे डोळे फोडू - कंगना रनौत - narendra modi

पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या १२ दिवसानंतर भारतीय हवाई दलाच्या मिराज-२००० या अत्यंत घातक लढाऊ विमानांनी एलओसीजवळ असलेल्या 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवादी तळांवर जोरदार हल्ला चढवला. भारतीय वायुसेनेच्या या कामगीरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. कलाविश्वातुनही या प्रत्युत्तराचे स्वागत केले जात आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावरून भारतीय वायुसेनेचे अभिनंदन केले आहे. अभिनेत्री कंगना रनौत हिनेही वायुदलाचे कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.

कंगना

By

Published : Feb 26, 2019, 10:19 PM IST

मुंबई -पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या १२ दिवसानंतर भारतीय हवाई दलाच्या मिराज-२००० या अत्यंत घातक लढाऊ विमानांनी एलओसीजवळ असलेल्या'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवादी तळांवर जोरदार हल्ला चढवला. भारतीय वायुसेनेच्या या कामगीरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. कलाविश्वातुनही या प्रत्युत्तराचे स्वागत केले जात आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावरून भारतीय वायुसेनेचे अभिनंदन केले आहे. अभिनेत्री कंगना रनौत हिनेही वायुदलाचे कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.

कंगनाने भारतीय वायुदलाचे कौतुक करत म्हटले, की 'मी भारतीय वायुदलाला सलाम करते. हा निर्णय तातडीने घेतल्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचेही आभार मानते'.

'आता जोही भारताकडे वाकड्या नजरेने पाहिल त्याचे डोळे फोडण्यात येतील', अशा शब्दात तिने भावना व्यक्त केल्या.

कंगनाच नव्हे, तर सलमान खान, अक्षय कुमार यांनीही सोशल मीडियावर वायुदलाचे कौतुक केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details