महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कंगना राणौतने जो बायडन यांना म्हटलं 'गजनी'

उपराष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कंगनाने कमला हॅरिस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर, बायडन यांना टोला लगावला आहे. कंगनाने ट्विटमध्ये लिहिलंय की, 'दर ५ मिनिटाला डाटा क्रॅश होणाऱ्या गजनी बायडेन यांच्याबद्दल मला खात्री नाही. त्यांना एवढी औषधं आणि इंजेक्शन देण्यात आली आहेत की, ते एक वर्षापेक्षा जास्त टिकू शकणार नाही.

kangana-ranaut-calls-joe-biden-ghajini
कंगना राणौत

By

Published : Nov 8, 2020, 3:15 PM IST

कुल्लू(हिमाचल प्रदेश) - अमेरिकाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटीक पक्षाचे जो बायडन यांनी बाजी मारली. गेले काही दिवस सुरू असलेल्या मतमोजणीची सर्वत्र चर्चा होती. डोनाल्ड ट्रम्प यांना हरवून बायडन अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष बनले आहे. निवडणूक जिंकल्यानंतर बायडन यांच्यावर जागतिक स्तरावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिनेत्री कंगना राणौतनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

उपराष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कंगनाने कमला हॅरिस यांनाशुभेच्छा दिल्या आहेत. तर, बायडन यांना टोला लगावला आहे. कंगनाने ट्विटमध्ये लिहिलंय की, 'दर ५ मिनिटाला डाटा क्रॅश होणाऱ्या गजनी बायडेन यांच्याबद्दल मला खात्री नाही. त्यांना एवढी औषधं आणि इंजेक्शन देण्यात आली आहेत की, ते एक वर्षापेक्षा जास्त टिकू शकणार नाही. त्यामुळे कमला हॅरिस याच पुढे सर्व जबाबदाऱ्या सांभाळतील. एक महिला समोर आली की, इतर महिलांसाठीही मार्ग तयार करते. या ऐतिहासिक दिनानिमित्त चियर्स.'

कमला हॅरिस यांचे भारताशी असलेले नाते -

कमला हॅरिस उपराष्ट्रध्यपदी विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला उमेदवार आहेत. पेशाने वकील असणाऱ्या कमला यांचे भारताशी निकटचे नाते आहे. कमला हॅरिस भारतीय- आफ्रिकन वंशाच्या असून त्यांचे आजोळ तामिळनाडूत आहे. लहानपणीचा बराच काळ कमला हॅरिस यांनी तामिळनाडूत घालवला आहे. कमला हॅरिस या भारतीय-आफ्रिकन वंशाच्या आहेत. त्यांचा जन्म कॅलिफोर्नियाच्या ऑकलँडमध्ये झाला. त्यांच्या आई श्यामला गोपालन या मुळच्या तामिळनाडूतील होत्या. मात्र, शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्यानंतर त्या तिकडेच स्थायिक झाल्या. श्यामला यांचे पती आफ्रिकन वंशाचे होते. श्यामला गोपालन या नावाजलेल्या कॅन्सर संशोधक आणि मानवाधिकार कार्यकर्त्या होत्या. परदेशात राहत असताना आपल्या मुलांची नाळ भारतासोबत जुळलेली असावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. कमला यांचे आई-वडील विभक्त झाल्यानंतर कमला हॅरिस आणि त्यांची बहीण माया दोघीजणी आईकडे राहत होत्या.

हेही वाचा -'उपराष्ट्राध्यक्ष पदावरील मी पहिली महिला, अमेरिकेच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करणार'

ABOUT THE AUTHOR

...view details