महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 20, 2021, 4:51 PM IST

ETV Bharat / sitara

Kangana ranaut facebook post : वाचा खलिस्तानी दहशतवाद्यांबद्दल काय म्हणते कंगना ?

खलिस्तानी दहशतवादी आज सरकारचे हात पिरगळण्याचा प्रयत्न करत आहेत. पण एका महिलेला विसरू नका. या एकमेव महिला पंतप्रधानांनी त्यांना आपल्या चपलेखाली चिरडले होते. अशा आशयाची फेसबुक पोस्ट सोशल मिडीयावर सध्या गाजत आहे.

kanagana ranaut
kanagana ranaut

मुंबई -बॉलिवूडची पंगा गर्ल अभिनेत्री कंगना रनौतने स्वातंत्र्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या ती चर्चेचा विषय ठरली आहे. कंगनाने काही दिवसांपूर्वी "१९४७ साली भारताला मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती' असं वादग्रस्त विधान केले होते.

कंगनाची फेसबुक पोस्ट


या विधानावरून आता देशभरातून तिच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. यानंतरही तिने अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. अशातच कंगनाने स्वातंत्र्याचा मुद्दा बाजूला ठेवत खलिस्तानी दहशतवादाच्या मुद्यावर नवं विधान केलं आहे. कंगनाने काल केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याच्या पंतप्रधान मोदींच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. यानंतर कंगनाने लगेल खलिस्तानवादी दहशतवादाच्या मुद्द्याला हात घालत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या खलिस्तानवादी दहशतवादाविरोधातील भूमिकेचे कौतुक केले आहे. या पोस्टमध्ये तिने देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा एक फोटो देखील शेअर केला आहे.

कंगनाची नवी फेसबुक पोस्ट
कंगनाने या पोस्टमध्ये लिहिले की, खलिस्तानी दहशतवादी आज सरकारचे हात पिरगळण्याचा प्रयत्न करत आहेत. पण एका महिलेला विसरू नका. या एकमेव महिला पंतप्रधानांनी त्यांना आपल्या चपलेखाली चिरडले होते. त्यांनी या देशाला कितीही त्रास दिला असला तरी, त्यांनी जीवाची बाजी लावून त्यांना डासासारखे चिरडले आहे. पण देशाचे तुकडे होऊ दिले नाहीत. त्यांच्या मृत्यूनंतरही. आजही त्यांच्या नावाने हे प्रकरण ओळखले जाते. त्याला एकच गुरू आहे. खलिस्तानी चळवळीच्या उदयाप्रमाणे त्यांची कहाणी देखील नेहमीपेक्षा अधिक समर्पक झाली आहे..खूप लवकरच तुमच्यासाठी आणत आहे.

गांधीजीं सत्तेचे भुकेले आणि धूर्त
कंगनाने महात्मा गांधींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून मोठा वाद निर्माण केला आहे. कंगना रानौतने तिच्या सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट टाकत गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. तिच्या पहिल्या पोस्टमध्ये, तिने गांधींना सत्तेचे भुकेले आणि धूर्त असल्याचे म्हटले होते, तर दुसऱ्या पोस्टमध्ये तिने लिहिले होते की, महात्मा गांधींचीच इच्छा होती की, भगतसिंगांना फाशीची शिक्षा व्हावी. इतक्यावर ती थांबली नाही तर अनेक टीका तिने यावर केल्या आहेत.

हेही वाचा -Vikram Gokhale on Kangana : ...म्हणून कंगना काहीही चुकीचं बोलली नाही असं मी म्हणालो - विक्रम गोखले

ABOUT THE AUTHOR

...view details