मुंबई - चीनमध्ये थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसमुळे आत्तापर्यंत बऱ्याच नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. या व्हायरसची जगभरात दहशत पसरली आहे. या व्हायरसचा संसर्ग झपाट्याने देशात पसरत आहे. या व्हायरसपासून वाचण्यासाठी जगभरात आव्हान केले जात असताना बॉलिवूडच्या एका अभिनेत्याने मात्र, भारतात या व्हायरसची लागण व्हावी, असे खळबळजनक ट्विट केले आहे.
बॉलिवूड अभिनेता कमाल आर. खान हा नेहमीच त्याच्या वादग्रस्त विधानांमुळे किंवा ट्विटमुळे चर्चेत असतो. तो नेहमी काही ना काही ट्विट शेअर करत असतो, ज्यामुळे नव्या वादाला तोंड फुटेल. आताही त्याने कोरोना व्हायरसला घेऊन ट्विट केल्याने तो चर्चेत आला आहे. मात्र, हे ट्विट त्याने नेमके का केले, हे जाणून घेऊयात.
हेही वाचा -फोटोग्राफर्सनी 'वहिनी' म्हणताच जेनेलियाच्या चेहऱ्यावर खुलले हसू, पाहा व्हिडिओ