मुंबई- अभिनेता कमल हासन यांनी आज ''हे राम'' चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आपला आनंद व्यक्त केला. यावेळी राणी मुखर्जी आणि हासन यांनी सिनेमाच्या २० वर्षापूर्वीच्या आठवणी जागवल्या.
''हे राम'' बद्दल सांगताना कमल हासन यांनी ट्विटरवर लिहिलंय, ''हे रामला २० वर्ष पूर्ण झाली आहेत. वेळेत चित्रपट बनवल्याचा आनंद आहे. परंतु ज्या शंका व्यक्त केल्या होत्या आणि ज्या गोष्टींची भिती व्यक्त केली होती ते देशात दुर्दैवाने घडताना दिसत आहे. आपल्याला या आव्हानाचा देशाच्या सामंजस्यासाठी मुकाबला करायला हवा आणि आपण तो करुयात...हम होंगे कामयाब.''
''हे राम'' हा पिरियॉडिक ड्रामा चित्रपट होता. भारताची फाळणी आणि गांधी हत्यावर आधारित याचा विषय होता. कमल हासनने दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात महत्त्वाची भूमिकाही केली होती.
या निमित्ताने राणी मुखर्जीने आपला अनुभव सांगितला आहे. कमल हासन यांनी तिला कमी उंचीबद्दल जो सल्ला दिला होता, त्याबद्दल सांगितले आहे.
राणी म्हणाली, ''मला आठवतं की माझी कमी उंची असल्यामुळे मी प्लॅटफॉर्म स्लिपर्स वापरत होते. जेव्हा हे कमलजींनी पाहिले तेव्हा म्हणाले, वेडी आहेस का? जा प्लॅट चप्पल घालून ये. तुझी ओळख तुझ्या उंचीवरुन होणार नाही तर तू काय योगदान दिलेस त्यावरुन होणार आहे. कमलजींच्या या सल्ल्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला.''
'हे राम' मध्ये भूमिका करणाऱ्या राणीने पुढे सांगितले, ''पहिल्या दिवशी जेव्हा कमलजींची भेट झाली तेव्हा ते म्हणाले जा, चेहरा धुवून ये जा. या गोष्टीमुळे मी बेचैन झाले होते. जेव्हा ती चेहरा धुवून आले तेव्हा ते म्हणाले, तु चेहरा साफ केलेला नाहीस. चेहरा असा धुवून ये की जसा तू पॅकअपच्यानंतर धुतेस.''
राणीने पुढे सांगितले, ''जेव्हा मी चेहरा धुवून आले तेव्हा संपूर्ण मेकअप निघाला होता. हे पाहून कमलींनी माझ्या चेहऱ्यावर बिंदी लावली आणि आर्टीस्टकडून थोडे काजळ लावायला सांगितले. नंतर ते म्हणाले की, आता आमची अपर्णा तयार आहे. त्यावेळी मला पहिल्यांदा कळले की आर्टीस्टला मेकअपची जरुरतच असते असे नाही.'''
राणीचा कमल हासन सोबत काम करण्याचा अनुभव खास होता. सिनेमाच्या सेटवर घालवलेला प्रत्येक्षण सुंदर असल्याचे तिने सांगितले.
'हे राम'या चित्रपटात शाहरुख खान, राणी मुखर्जी, हेमा मालिनी, नसीरुद्दीन शाह, फरीदा जलाल आणि अतुल कुलकर्णी यांनी भूमिका साकारल्या होत्या. शाहरुख आणि राणीचा हा दाक्षिणात्य पदार्पणाचा चित्रपट होता. बॉक्स ऑफिसवर फार कमाल झाली नसली तरी या चित्रपटाचे कौतुक सर्व स्तरातून झाले होते.