महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कमल हासनच्या 'इंडियन २' सेटवर क्रेन कोसळली, तिघांचा मृत्यू - कमाल हासनच्या 'इंडियन २' सेटवर क्रेन कोसळली, तिघांचा मृत्यू

कमल हासनने 'इंडियन २' सिनेमाच्या सेटवर झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांसाठी शोक व्यक्त केलाय. हासन यांनी ट्विटरवरुन आजपर्यंतचा हा सर्वात मोठा अपघात असल्याचे म्हटलंय.

death of three people on Indian 2 set
'इंडियन २' सेटवर क्रेन कोसळली, तिघांचा मृत्यू

By

Published : Feb 20, 2020, 12:25 PM IST

चेन्नई - अभिनेता कमल हासनने सेटवर झालेल्या अपघात बळी गेलेल्यांबद्दल शोक व्यक्त केलाय. 'इंडियन २' या सिनेमाच्या सेटवर क्रेन कोसळून तिघांचा मृत्यू बुधवारी रात्री झाला होता.

हासन यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, ''मी अनेक अपघात पाहिले आहेत, परंतु हा सर्वात भयानक होता. मी तीन दोस्तांना गमावलंय. माझ्यापेक्षा त्यांच्या कुटुंबीयांना जास्त दुःख झेलावं लागत आहे. मनःपूर्वक सहानुभुती.''

'इंडियन २' सेटवर क्रेन कोसळली, तिघांचा मृत्यू

'इंडियन २' सिनेमाच्या सेटवर क्रेन कोसळल्याने ९ जण गंभीर जखमी झाले. यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. इतरांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कमल हासन यांनी रुग्णालयात येऊन जखमींची विचारपूस केली. त्यांच्यावर उत्तम इलाज होईल यासाठी त्यांनी रुग्णालय प्रशासनाबरोबर चर्चा केली आहे.

या भयानक अपघातामध्ये प्रसिध्द दिग्दर्शक शंकर यांचा सहाय्यक मधु, सहदिग्दर्शक कृष्णा आणि स्टाफचा एक व्यक्ती चंदन यांनी आपला जीव गमावला. इतरांच्यावर उपचार सुरू आहेत.

कमल हासन यांच्या 'इंडियन २' चे दिग्द्रशन शंकर करत आहेत. 'इंडियन' या सिनेमाचा हा दुसरा भाग आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details