चेन्नई - ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माते कमल हसन शनिवारी आपला 66 वा वाढदिवस साजरा करीत आहेत. या खास प्रसंगी त्यांच्या मुलींनी आपल्या 'बापूजी'ला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
वडिलांसोबत बालपणाचा फोटो शेअर करताना श्रुतीने इन्स्टाग्रामवर लिहिलंय, "माझ्या बापूजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अप्पा, आतापर्यंतच्या अनेक वर्षांप्रमाणेच हे वर्ष तुम्हाला चांगले जाओ. जगासाठी तुम्ही जो काही संग्रह केलाय, ते पाहण्याची जास्त प्रतीक्षा मी नाही करु शकत."