मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलीनच्या घरी एका नव्या पाहुणीचे आगमन झाले आहे. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. काही महिन्यांपूर्वीच कल्कीने आई बनणार असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली होती. कल्कीचा गरोदरपणा हा बराच चर्चेचा विषय बनला होता. कारण, कल्कीने अद्याप तिच्या प्रियकराशी लग्न केले नाही. त्यामुळे लग्नापूर्वीच कल्की आई बनली आहे.
कल्की आणि तिचा प्रियकर गाय हर्शबर्ग हे गेल्या काही वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत घटस्फोट झाल्यानंतर कल्कीने हर्शबर्गसोबत लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. गाय हर्शबर्ग हा इस्रायलचा क्लासिकल पियॉनो वादक आहे. त्यानंतर तिने गरोदर असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली होती. मात्र, तिला या कारणामुळे काहींनी ट्रोलही केले होते. मात्र, या ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करून कल्की तिच्या निर्णयावर ठाम राहिली होती.