मुंबई- आलिया भट्ट, वरूण धवन, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा आणि माधुरी दीक्षित यांच्या मुख्य भूमिका असलेला 'कलंक' चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अशात गुरुवारपासून या चित्रपटातील कलाकारांचे लूक प्रदर्शित करण्यात आले.
अधिकृत घोषणा; या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'कलंक' - sanjay dutta
रिलीज डेटसोबतच चित्रपटाच्या टीझरविषयी देखील माहिती देण्यात आली आहे. १२ मार्चला या चित्रपटाचा खास टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आता या पाठोपाठ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली गेली आहे. १७ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. याआधी हा चित्रपट १९ एप्रिलला प्रदर्शित होणार असल्याचे वृत्त होते, मात्र आता ही रिलीज डेट बदलण्यात आली आहे.
रिलीज डेटसोबतच चित्रपटाच्या टीझरविषयी देखील माहिती देण्यात आली आहे. १२ मार्चला या चित्रपटाचा खास टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक वर्मन यांनी केले आहे, तर करण जोहरची निर्मिती आहे.