मुंबई - दिग्दर्शक करण जोहरच्या 'कलंक' चित्रपटाची बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकही फार उत्सुक असल्याचे पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आलाय. या टीजरमध्ये चित्रपटातील सर्व कलाकारांची दमदार झलक पाहायला मिळाली. या चित्रपटाचा ट्रेलरही लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटाचं पहिलं गाणं 'घर मोहे परदेसीया' हे रिलीज करण्यात आलं आहे.
'घर मोहे परदेसीया' गाण्याचा दमदार टीजर आधीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यामुळे आज गाणं रिलीज होताच यावर चाहत्यांच्या लाईक्सचा पाऊस पडला आहे. श्रेया घोषाल आणि वैशाली भैसने-माडे यांच्या दमदार आवाजातील गाण्यावर आलिया भट्ट आणि माधुरी दिक्षीत यांची अप्रतिम जुगलबंदी पाहायला मिळते.