मुंबई - दिग्दर्शक करण जोहरच्या निर्मितीअंतर्गत तयार होत असलेल्या 'कलंक' चित्रपटाची दिवसेंदिवस उत्कंठा वाढत चालली आहे. या चित्रपटाचा टीजर, पहिलं गाणं आणि कलाकारांचे लूक्स आधीच प्रदर्शित झाले आहेत. आता चाहत्यांना चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतिक्षा आहे. लवकरच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटाचं दुसरे 'फर्स्ट क्लास' हे गाणे रिलीज करण्यात आले आहे.
'कलंक': वरुण धवन-कियारा आडवाणीचा 'फर्स्ट क्लास' डान्स असलेलं गाणं प्रदर्शित - first class song
'फर्स्ट क्लास' या गाण्यात वरूण धवनसोबत कियारा आडवाणीचा धमाकेदार डान्स पाहायला मिळतो.
'फर्स्ट क्लास' या गाण्यात वरूण धवनसोबत कियारा आडवाणीचा धमाकेदार डान्स पाहायला मिळतो. आदित्य रॉय कपूर आणि आलिया भट्ट यांचीही झलक या गाण्यात पाहायला मिळते. हे गाणे अरजीत सिंग आणि निती मोहन यांनी गायले आहे. अमिताभ भट्टाचार्य यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. रेमो डिसूजाने या गाण्याला कोरियोग्राफ केले आहे. तर, प्रितमच्या संगीताच्या साज गाण्याला लागला आहे.
'कलंक' चित्रपटात वरूण धवन हा 'जफर'ची भूमिका साकारत आहे. मल्टीस्टारर असलेल्या या चित्रपटात आलिया भट्ट त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
या दोघांव्यतीरिक्त या चित्रपटात माधुरी दिक्षित सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त आणि आदित्य रॉय कपूर यांचीही मुख्य भूमिका आहे. अभिषेक वर्मन हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.