मुंबई - मल्टीस्टारर असलेला बहुप्रतिक्षीत 'कलंक' चित्रपट काल (बुधवार, १७ एप्रिलला) प्रदर्शित झाला. आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, वरुण धवन, सोनाक्षी सिन्हा, माधुरी दिक्षित, संजय दत्त अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात झळकली. 'कलंक'च्या टीजरपासून ते ट्रेलर आणि यातील भव्यदिव्य सेट्सपर्यंत हा चित्रपट चर्चेत होता. त्यामुळे पहिल्याच दिवशी 'कलंक'ला दमदार ओपनिंग मिळाली आहे.
वरुण-आलियाच्या करिअरमधला पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला 'कलंक', जाणून घ्या कमाई - aditya roy kapoor
या चित्रपटाने 'केसरी', 'गली बॉय' आणि 'टोटल धमाल' या चित्रपटाने पहिल्या दिवशी केलेल्या कमाईचा विक्रम मोडला आहे.
'कलंक' चित्रपटाने पहिल्याच दिवशी २१.६० कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट वरुण धवन आणि आलिया भट्ट यांच्या आत्तापर्यंतच्या करिअरमधला पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. तसेच, या चित्रपटाने 'केसरी', 'गली बॉय' आणि 'टोटल धमाल' या चित्रपटाने पहिल्या दिवशी केलेल्या कमाईचा विक्रम मोडला आहे.
'कलंक' चित्रपटात 'नाजायज मोहोब्बत का अंजाम अक्सर तबाही होता है....', 'मेरे पास खोने को कुछ है ही नही', 'कुछ रिश्ते कर्जों की तरह होते उन्हे निभाना नही चुकाना पडता है' हे संवाद चित्रपटाचा ट्रेलर आणि टीझरमधून प्रेक्षकांची मनं जिंकून गेले होते. कलाकारांनीही या चित्रपटाचे दमदार प्रमोशन केले होते. आता आठवड्याच्या शेवटपर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करण्यात आणखी किती यशस्वी होतो, हे पाहणे रंजक ठरेल.