महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'असा' घडला 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर', काजोलने शेअर केला मेकिंग व्हिडिओ - Tanhaji the unsung warrior release date

'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' हा चित्रपट तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित आहे. कोंढाणा गड सर करण्यासाठी त्यांनी आपल्या मुलाचे लग्न बाजुला ठेवुन प्राणाची बाजी लावली. त्यांची ही शौर्यगाथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

Kajol shares Tanhaji the unsung warrior making video
'असा' घडला 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर', काजोलने शेअर केला मेकिंग व्हिडिओ

By

Published : Jan 5, 2020, 6:41 PM IST

मुंबई -अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' हा चित्रपट १० जानेवारीला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने काजोल आणि अजय देवगणची जोडी बऱ्याच काळानंतर पडद्यावर पाहायला मिळणार आहे. एतिहासिक असलेला हा चित्रपट तयार करताना नेमकी कशी मेहनत घ्यावी लागली, हे दाखवणारा एक व्हिडिओ काजोलने शेअर केला आहे.

'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' हा चित्रपट तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधरीत आहे. कोंढाणा गड सर करण्यासाठी त्यांनी आपल्या मुलाचे लग्न बाजुला ठेवुन प्राणाची बाजी लावली. त्यांची ही शौर्यगाथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा -नेहा पेंडसेची लगीनघाई, पाहा संगीत आणि मेहंदी सेरेमनीचे फोटो

काजोलने या चित्रपटाचा मेकिंग व्हिडिओ पोस्ट केला आहे. पडद्यामागे तान्हाजी साकारताना काय मेहनत घेतली, हे दिग्दर्शक ओम राऊत या व्हिडिओमध्ये सांगताना दिसतात. 'तान्हाजी द अनसंग वॉरिअर' हा चित्रपट मराठी भाषेतही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा -'छपाक'च्या सेटवर दीपिकाने साजरा केला वाढदिवस

अजय देवगन शिवाय यामध्ये सैफ अली खान, शरद केळकर आणि इतर बरेच मराठी कलाकार देखील यामध्ये भूमिका साकारणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details