मुंबई -बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि काजोलची आई असलेल्या तनुजा यांची प्रकृती काही दिवसांपासून खालावलेली होती. मुंबईच्या लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्यावर अलिकडेच सर्जरी करण्यात आली. आता त्यांची प्रकृती स्थिर असून लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याचे बोलले जात आहे. काजोलनेही त्यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची प्रकृती स्थिर, काजोलने शेअर केला फोटो - mumbai
काही दिवसांपूर्वीच काजोलचे सासरे आणि अजय देवगणचे वडील वीरू देवगण यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने कलासृष्टीला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर लगेचच तनुजा यांनाही रुग्णालयात भरती करावे लागले.
![ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची प्रकृती स्थिर, काजोलने शेअर केला फोटो](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3517591-43-3517591-1560137821841.jpg)
काही दिवसांपूर्वीच काजोलचे सासरे आणि अजय देवगणचे वडील वीरू देवगण यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने कलासृष्टीला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर लगेचच तनुजा यांनाही रुग्णालयात भरती करावे लागले. तनुजा यांना डायवर्टीकुलिटिस नावाचा आजार आहे. पचनयंत्रणेशी हा आजार संबधीत आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. सर्जरीनंतर तनुजा यांचे वजन घटले आहे. काजोलने शेअर केलेल्या फोटोत दोघीही आनंदी दिसत आहेत. काजोलने चाहत्यांचे आभारही मानले आहेत.
तनुजा यांनी पितृऋण, 'अ डेथ इन द गंज', 'आरंभ', 'सोनार पहाड' यांसारख्या प्रोजेक्टमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. 'मेमदीदी', 'चांद ओर सुरज', 'बहारे फिर भी आएंगी', 'ज्वेल थीफ', 'नई रोशनी', 'जीने की राह', 'हाथी मेरे साथी', 'अनुभव', 'मेरे जीवन साथी' आणि 'दो चोर' या चित्रपटातही त्या मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या.