महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'तान्हाजी'नंतर 'या' शार्टफिल्ममध्ये झळकणार काजोल, फर्स्ट लुक प्रदर्शित - #Kajol

'देवी' या शॉर्टफिल्म अभिनेत्री श्रृती हासन, निना कुलकर्णी, मुक्ता बर्वे, संध्या म्हात्रे, रमा जोशी, शिवानी रघुवंशी, नेहा धुपिया आणि यशस्विनी दायमा यांच्याही महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहेत.

Kajol First Short film Devi first look release
'तान्हाजी'नंतर शार्टफिल्ममध्ये झळकणार काजोल, फर्स्ट लुक प्रदर्शित

By

Published : Jan 16, 2020, 5:58 PM IST

मुंबई -अभिनेत्री काजोल सध्या अजय देवगनसोबत साकारलेल्या 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिने या चित्रपटात तानाजी मालुसरे यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार वाटचाल करत आहे. आता या चित्रपटानंतर काजोल 'देवी' या शॉर्ट फिल्ममध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे.

काजोलने 'देवी' या शॉर्टफिल्मचा पहिला लुकही पोस्ट केला आहे. यामध्ये अभिनेत्री श्रृती हासन, निना कुलकर्णी, मुक्ता बर्वे, संध्या म्हात्रे, रमा जोशी, शिवानी रघुवंशी, नेहा धुपिया आणि यशस्विनी दायमा यांच्याही महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहेत.

'देवी' या शॉर्ट फिल्मचा फर्स्ट लुक

हेही वाचा -'What's in your Dabba Challenge', बॉलिवूडकरांनी स्विकारलं आव्हान

काजोलची ही पहिली शॉर्टफिल्म आहे. या शॉर्टफिल्म बद्दल सांगताना ती म्हणाली, की 'देवीच्या कथेपेक्षा आणखी चांगला विषय कोणताच नाही. प्रियांका बॅनर्जी यांनी अतिशय धाडसी कथा लिहिली आहे. यामध्ये मी 'ज्योती'ची भूमिका साकारत आहे. आज स्त्रियांवरील अत्याचार, स्त्री- पुरूष असमानता यांसारख्या गोष्टींना सतत सामोरे जावे लागते. 'देवी' हा अशाच आशयावर आधारित असलेली शॉर्ट फिल्म आहे'.

निरांजन अय्यंगर आणि रेयान स्टिफन्स इलेक्ट्रिक अ‌ॅपल एंटरटेनमेंट यांच्यावतीने या शॉर्टफिल्मची निर्मिती करण्यात येत आहे. तर, प्रियांका बॅनर्जी दिग्दर्शन करत आहेत.

हेही वाचा -Exclusive Interview: कसा होता 'हॅप्पी, हार्डी अँड हिर'चा प्रवास, हिमेशने उलगडले किस्से

ABOUT THE AUTHOR

...view details