महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

काजोलचा 'चोर पोलीस' खेळण्याचा चाहत्यांना सल्ला - काजोलचा सेल्फी फोटो

अभिनेत्री काजोलने शेअर केला फोटो जितका आकर्षक आहे तितकेच कॅप्शनेही लोकांचे लक्ष वेधले आहे. चाहत्यांसोबत चोर पोलीस खेळण्याचा मनोदय तिने बोलून दाखवलाय.

Kajol
काजोल

By

Published : Oct 5, 2020, 4:21 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री काजोल सोशल मीडियावरुन आपल्या चाहत्यांचे नेहमी मनोरंजन करीत असते. तिने अलिकडेच शेअर केली इन्स्टाग्रामवरील पोस्ट त्याचे उत्तम उदाहरण आहे. तिने रविवारी एक फोटो पोस्ट केला होता. यात ती मास्क घातलेली दिसते. मॉलच्या स्वयंचलित जीन्यावरील (एलिवेटर) हा फोटो आहे.

काजोलने या फोटोला जे कॅप्शन दिले आहे त्याकडे सर्वांचे लक्ष आकर्षित झाले आहे.

तिने कॅप्शनमध्ये लिहिले, ''चला चोर पोलीस खेळूयात, कोण तयार आहे???"

प्रतिक्रिया देताना एका चाहत्येने लिहिले, ''चला खेळूयात. मी पोलीस बनतो आणि तुम्हाला पकडतो.''

तर आणखी एकाने लिहिले, "हाहाहा. तुमचा कॅप्शन गेम खूप मजबूत आहे."

अभिनेत्री काजोल आगामी 'त्रिभंगा' चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details