मुंबई- अभिनेत्री काजल अग्रवालने 30 ऑक्टोबरला तिचा प्रियकर उद्योजक गौतम किचलूसोबत मुंबईत लग्नगाठ बांधली होती. कोरोनाच्या काळात अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला होता. त्यानंतर दोघेही हनिमूनसाठी मालदीवला गेले असून तिथले काही रोमँटिक फोटो काजलने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
काजलने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये ती पती गौतमसोबत समुद्र किनाऱ्यावर फोटोसाठी पोज देताना दिसत आहे.
हेही वाचा - अभिनेत्री काजल अग्रवालचं आफ्टर मॅरेज फोटोशूट पाहिलंत का?
काजल आणि तिचा प्रियकर असलेला गौतम किचलू यांनी ३० ऑक्टोबरला लग्न केले होते. खूप काळ डेटिंग केल्यानंतर तिने ६ ऑक्टोबरला आपण लग्न करीत असल्याचे सांगितले होते.
हेही वाचा - दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवालला 'ताजमहाल'च्या सौंदर्याची भूरळ, पाहा फोटो
काजोलने लिहिले होते, "मला हे सांगताना आनंद होत आहे की ३० ऑक्टोबरला मी गौतम किचलूसोबत एका खासगी कार्यक्रमात लग्न करीत आहे. या कोरोनाच्या साथीने आमच्या आनंदावर पडदा टाकला आहे, परंतु आम्ही आयुष्याची सुरुवात करण्यासाठी खूप उत्सुक आहोत. अनेक वर्षांपासून तुम्ही माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केलाय, यासाठी आपले आभार मानते. नवीन आयुष्याला सुरुवात करताना तुमचा आशीर्वाद मला हवा आहे."