सैराट चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर आकाश ठोसर आणि रिंकु राजगुरु ही जोडी लोकप्रिय झाली. त्यानंतर आकाशने एफयू या चित्रपटात काम केले. मात्र रिंकुला चित्रपटासाठी प्रतीक्षा करावी लागली. आता तिच्या दुसऱ्या मराठी चित्रपटाची चर्चा आहे. कागर या आगामी चित्रपटात ती अनोख्या भूमिकेत झळकणार आहे.
कागर टीझर : त्यांचं ठरलंय, एकदा जीव लावला की Permanent Love... - Kagar
रिंकु राजगुरुच्या आगामी सिनेमाची झलक झळकली आहे...कागर या सिनेमात ती अनोखी भूमिका साकारत आहे...२६ एप्रिलला सिनेमा रिलीज होईल
रिंकु राजगुरुच्या आगामी सिनेमाची झलक
कागर चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवणारा टीझर आता प्रदर्शित झालाय. यात रिंकु अत्यांत करारी भूमिकेत दिसत आहे. येत्या २६ एप्रिलला हा चित्रपट सर्वत्र झळकणार आहे.
कागर हा तसा फारसा प्रचलित शब्द नाही. सैराटही नव्हता. मात्र शीर्षकापासून उत्कंठा वाढवण्याचा उत्तम प्रयोग रिंकुच्या बाबतीत दुसऱ्यांदा घडतोय. कागर या शब्दाचा अर्थ आहे उत्तुंग भरारी घेण्यासाठी आसुसलेल्या पक्ष्याचे नाजुक पंख. चित्रपटाच्या टीझरमध्ये त्याची झलक पाहायला मिळत आहे.