महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'कागर' चित्रपटातील 'नागीण डान्स' गाणं सोशल मीडियावर हिट - adarsh shinde

गायक आदर्श शिंदे यांच्या दमदार आवाजात असलेलं हे गाणं चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. अल्पावधीतच यू-ट्यूबवर या गाण्याला भरभरुन व्हिव्ज मिळाले आहे. वैभव देशमुख यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.

'कागर' चित्रपटातील 'नागीण डान्स' गाणं सोशल मीडियावर हिट

By

Published : Apr 20, 2019, 8:26 AM IST

मुंबई - 'सैराट' फेम रिंकू राजगुरू आणि शुभंकर तावडे यांचा 'कागर' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. निवडणुकीच्या धामधुमीत या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटातील 'लागलिया गोडी तुझी' या गाण्यानंतर आणखी एक गाणं रिलीज करण्यात आले आहे. 'नागीण डान्स' असे या गाण्याचे बोल असुन सोशल मीडियावर हे गाणं हिट ठरत आहे.

गायक आदर्श शिंदे यांच्या दमदार आवाजात असलेलं हे गाणं चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. अल्पावधीतच यू-ट्यूबवर या गाण्याला भरभरुन व्हिव्ज मिळाले आहे. वैभव देशमुख यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. उडत्या चालीचं असलेल्या या गाण्यात 'सैराट' मधील 'झिंगाट' गाण्याप्रमाणेच झिंगाट डान्सही केला आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मकरंद माने यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. राजकारणावर आधारित असलेल्या या चित्रपटात रिंकू राजगुरुची महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहे. 'सैराट'नंतर पुन्हा एकदा तिला पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता आहे. अभिनेता शुभंकर तावडे हा या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. आकाश ठोसर नंतर रिंकू आणि शुभंकरच्या जोडीला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे रंजक ठरेल. २६ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details