महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Exclusive Interview: ...म्हणून कबीर खानच्या वेबसीरिजसाठी शाहरुखने कोणतेही मानधन घेतले नाही - kabir khan films

'द फॉरगॉटन आर्मी : आजादी के लिए' या वेबसीरिजमध्ये किंग खान शाहरुखचा आवाज आहे. यासाठी त्याने कोणतेही मानधन घेतले नाही, असा खुलासा कबीर खानने यावेळी केला.

Kabir Khan wanted to make film on INA with SRK
Exclusive Interview: ...म्हणून कबीर खानच्या वेबसीरिजसाठी शाहरुखने कोणतेही मानधन घेतले नाही

By

Published : Jan 12, 2020, 12:37 PM IST

मुंबई -दिग्दर्शक कबीर खान सध्या त्याच्या आगामी 'द फॉरगॉटन आर्मी : आजादी के लिए' या वेबसीरिजच्या प्रदर्शनाच्या तयारीला लागला आहे. ही वेबसीरिज लष्करावर आधारित आहे. या वेबसीरिजबाबत कबिर खानने अलिकडेच 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला.

'द फॉरगॉटन आर्मी : आजादी के लिए' या वेबसीरिजमध्ये किंग खान शाहरुखचा आवाज आहे. यासाठी त्याने कोणतेही मानधन घेतले नाही, असा खुलासा कबीर खानने यावेळी केला.

कबीर खान

हेही वाचा -'तख्त'च्या लोकेशनचा शोध संपला, करण जोहरने शेअर केला फोटो

'ही वेबसीरिज एका सत्यघटनेवर आधारित आहे. शाहरुखने खूप चांगल्याप्रकारे व्हाईसओव्हर दिला आहे. या वेबसीरिजच्या काही भागांमध्ये खरे दृश्य वापरण्यात आले आहेत. यामध्ये शाहरुखचा आवाज आहे. जेव्हा या सीरीजचे कथानक पूर्ण झाले होते, तेव्हाच शाहरुखसोबत चर्चा केली होती. या सीरिजमध्ये शाहरुखचीच भूमिका असावी, अशी माझी इच्छा होती'. मात्र, वेळेअभावी ही इच्छा अपूर्ण राहीली. पण, शाहरुखने आवाज देण्यासाठी कोणतेही मानधन घेतले नाही', असे कबीरने 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

हेही वाचा -'केजीएफ' स्टार यशच्या वाढदिवसाला ५ हजार किलोचा केक, जागतिक विक्रमात नोंद!!

ABOUT THE AUTHOR

...view details