महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

जंगल सफारीचा थरारक अनुभव भारतीयांना देण्यासाठी 'जंगल क्रूझ' सज्ज - Jungle Cruise to open in Indian theaters

जंगल सफारीचा थरारक अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. वॉल्ट डिज्नेचा 'जंगल क्रूझ' हा चित्रपट भेटीला येणार आहे. अॅमॅझॉनच्या खोऱ्यातील नदी मार्गाने जाणाऱ्या क्रूझवरून सफर करण्याची अनोखी पर्वणी प्रेक्षकांना मिळणार हे निश्चित.

जंगल क्रूझ

By

Published : Oct 12, 2019, 6:42 PM IST

'जंगल क्रूझ' चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आलंय. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी शेअर केलेल्या या डिज्नेच्या पोस्टरमध्ये ड्वेन जॉन्सन आणि इमिली ब्लन्ट क्रूझवर सफर करताना दिसत आहेत. या चित्रपटाचा थरारक ट्रेलरदेखील रिलीज करण्यात आलाय.

'जंगल क्रूझ'मध्ये ड्वेन जॉन्सन क्रूझचा कॅप्टनच्या भूमिकेत आहे आणि इमिली ब्लन्ट रिसर्चसाठी क्रूझवर दाखल झाली आहे. यांच्यासोबत एडगर रॅमिर्झ, जॅक व्हाईटहाल, जेस्से प्लेमोन्स आणि पॉल जिएमॅटी यांच्या भूमिका आहेत.

जाउम कोलेट - सेर्रा यांनी 'जंगल क्रूझ'चे दिग्दर्शन केले आहे. २४ जुलै २०२० मध्ये हा चित्रपट भारतासह जगभर प्रदर्शित होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details