महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

तेजश्री प्रधानच्या 'जजमेंट' सिनेमाचा काळजाचा थरकाप उडवणारा ट्रेलर लाँच - marathi movie

आपल्या समाजात स्त्रियांवर होणारे अत्याचार हा तसा संवेदनशील विषय आहे. यावर आधारित अनेक चित्रपट यापूर्वी आले. परंतु हा चित्रपट मागील सर्व चित्रपटांपेक्षा नक्कीच वेगळा ठरणार आहे

'जजमेंट' सिनेमाचा ट्रेलर लाँच

By

Published : Apr 24, 2019, 10:07 AM IST

मुंबई- बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित अशा 'जजमेंट' या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून आणि चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमाबद्दल रसिकांमध्ये कमालीचे कुतूहल होते. अशात आता या सिनेमाच्या ट्रेलर प्रदर्शनामुळे प्रेक्षकांमध्ये असलेली उत्सुकता आणखीच वाढली आहे.

मुळातच आपल्या समाजात स्त्रियांवर होणारे अत्याचार हा तसा संवेदनशील विषय आहे. यावर आधारित अनेक चित्रपट यापूर्वी आले. परंतु हा चित्रपट मागील सर्व चित्रपटांपेक्षा नक्कीच वेगळा ठरणार आहे. आता या चित्रपटाचे वेगळेपण नक्की काय असेल, हे तर चित्रपट पाहिल्यावर लक्षात येईलच. पण दमदार अभिनय, उत्कृष्ट कथा आणि संवेदनशील विषय या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत. अस्तित्वाच्या लढाईसाठी 'तिच्या' जीवघेण्या संघर्षाचे भेदक चित्रण या चित्रपटात आपल्याला दिसणार आहे.

या चित्रपटात तेजश्री प्रधान, मंगेश देसाई, श्वेता पगार, माधव अभ्यंकर, सतीश सलागरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे निर्माता डॉ. प्रल्हाद खंदारे आणि सह निर्माता हर्षमोहन कृष्णात्रेय आहे. समीर रमेश सुर्वे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट नीला सत्यनारायण यांच्या 'ऋण' या कादंबरीवर आधारित आहे. निवृत्त सनदी अधिकारी आणि उत्कृष्ट लेखिका अशी नीला सत्यनारायण यांची ओळख आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details