मुंबई -बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या 'छपाक' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात दीपिकाने साकारलेली लक्ष्मी अग्रवालची भूमिका प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारी आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून दीपिकाचा अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या तरुणीच्या रुपात दिसली. मात्र, तिच्यासाठी हा प्रवास नेमका कसा होता, हे सांगणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
दीपिकाने या चित्रपटात 'मालती' नावाचे पात्र साकारले आहे. लक्ष्मी अग्रवाल या तरुणीचं आयुष्य अॅसिड हल्ल्यानंतर कसं बदललं, हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. लक्ष्मी सारखा लुक करण्यासाठी प्रोस्थेटिक मेकअपचा वापर करण्यात आला. हा मेकअप करताना सलग ६ ते ७ तास सलग एका ठिकाणी बसून दीपिकाचा हा लुक साकारण्यात येत होता.
हेही वाचा -रणबीर कपूरसोबत जमणार श्रध्दा कपूरची जोडी, श्रध्दाचा उत्साह द्विगुणीत