मुंबई - बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम आपल्या आगामी 'पागलपंती' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'पागलपंती' हा एक मल्टीस्टारर चित्रपट आहे. यामध्ये अरशद वारसी, अनिल कपूर, पुलकित सम्राट, इलियाना डिक्रुझ, क्रिती खरबंदा, उर्वशी रौतेला आणि सौरभ शुक्ला यांसारखी स्टारकास्ट मुख्य भूमिकेत आहे. कॉमेडी ड्रामा असलेल्या 'पागलपंती' चित्रपटातील या सर्व कलाकारांचे फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आले आहेत.
चित्रपटाच्या प्रत्येक पोस्टरमध्ये प्रत्येक कलाकाराचं पात्र नेमकं कसं आहे, याची झलक पाहायला मिळते. प्रत्येकजण यामध्ये 'पागलपंती' करताना दिसतो.
या चित्रपटाच्या निमित्ताने जॉन बऱ्याच दिवसानंतर कॉमेडी चित्रपटात भूमिका साकारत आहे. या चित्रपटात तो 'राज किशोर' हे पात्र साकारत आहे.
हेही वाचा- "परीसारख्या सुंदर मुलीला तुम्ही भूतनी म्हणता...लाज वाटत नाही"
'दिमाग मत लगाना क्योंकी इनमे है ही नही', अशी टॅगलाईन असलेलं पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं आहे. यावरुन चित्रपटात केवळ धमाल पाहायला मिळणार, याचा अंदाज लावता येतो.
दिग्दर्शक अनिस बज्मी हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. तर, भूषण कुमार, कृष्ण कुमार, मंगत पाठक, अभिषेक पाठक यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. लंडन आणि लीडस यांसारख्या ठिकाणी या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करण्यात आलं आहे. मुंबईच्या काही भागांमध्येही हा चित्रपट शूट करण्यात आला आहे. २२ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.
हेही वाचा- सलमानच्या चाहत्यांसाठी खूशखबर! 'राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई'ची झाली घोषणा