महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

जितेंद्र जोशी, अमृता खानविलकरचा 'चोरीचा मामला', पाहा धमाल ट्रेलर - 'चोरीचा मामला' ट्रेलर प्रदर्शित

प्रियदर्शन जाधवच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जितेंद्र जोशी, अमृता खानविलकर, हेमंत ढोमे, कीर्ती पेंढारकर, अनिकेत विश्वासराव आणि क्षिती जोग यांची झलक पाहायला मिळते.

चोरीचा मामला ट्रेलर,Choricha mamla trailer release, Jitendra Joshi in Choricha mamla, Amruta Khanvilkar in Choricha mamla, Choricha mamla star cast, Choricha mamla news, 'चोरीचा मामला' ट्रेलर प्रदर्शित, Choricha mamla marathi film release date
जितेंद्र जोशी, अमृता खानविलकरचा 'चोरीचा मामला', पाहा धमाल ट्रेलर

By

Published : Jan 21, 2020, 1:01 PM IST

मुंबई -अभिनेता जितेंद्र जोशी आणि ग्लॅमरस अभिनेत्री अमृता खानविलकर यांचा 'चोरीचा मामला' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. दमदार स्टारकास्ट आणि धमाल मनोरंजन असलेल्या या ट्रेलरला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

प्रियदर्शन जाधवच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जितेंद्र जोशी, अमृता खानविलकर, हेमंत ढोमे, कीर्ती पेंढारकर, अनिकेत विश्वासराव आणि क्षिती जोग यांची झलक पाहायला मिळते.

एका चोरीमुळे होणारी गुंतागुंत, त्यानंतर घडणारे प्रसंग अतिशय खुमासदार पद्धतीने रंगवण्यात आली आहेत. हा चित्रपट विनोद आणि मनोरंजनाने पूर्ण असल्याचा अंदाज या ट्रेलरवरून लावता येतो. याशिवाय चित्रपटाचं संगीतही ताल धरायला लावणारं आहे.

हेही वाचा -अमिताभ बच्चन यांच्या 'झुंड' चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित

जितेंद्र जोशीनेही या चित्रपटाचे पोस्टर शेअर करून ट्रेलरची लिंक शेअर केली आहे. 'जगात चांगुलपणा शिल्लक आहे... आमचा चोरीला गेलेला ट्रेलर परत मिळाला.. आवडून घ्या आणि सगळ्यांबरोबर वाटा', असे कॅप्शन त्याने या फोटोवर दिले आहे.

एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट प्रस्तुत आणि स्वरुप स्टुडिओज निर्मित सुधाकर ओमळे, आकाश पेंढारकर, सचिन नारकर, विकास पवार यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रियदर्शननेच चित्रपटाचे लेखन तर, चिनार महेश यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. ३१ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -'भूल भुलैय्या २'मध्ये दिसणार अक्षय कुमारच्या चित्रपटातील २ गाणी

ABOUT THE AUTHOR

...view details