मुंबई - बॉलिवूडचं क्यूट लव्हबर्ड म्हणून अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया यांच्या जोडीची ओळख आहे. रितेशचा आज ४१ वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त जेनेलियाने त्याच्यासोबतचा एक फोटो शेअर करून खास रोमॅन्टिक अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.
रितेश - जेनेलियाची लव्हस्टोरी सर्वांना माहितीच आहे. 'तुझे मेरी कसम' या चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा ओळख झाली होती. सुरुवातीला मैत्री आणि नंतर हळूवार त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली होती. मात्र, तब्बल ८ वर्षानंतर जेनेलियाने रितेशला लग्नासाठी होकार दिला. आता त्यांच्या लग्नालाही ७ वर्षे पूर्ण झाली आहेत. २०१२ साली त्यांनी लग्नगाठ बांधली होती.
हेही वाचा- हिंदीसह तेलुगु आणि तमिळ भाषेतही प्रदर्शित होणार 'स्ट्रीट डान्सर थ्रीडी'
रितेश आणि जेनेलियाच्या जोडीची प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेझ पाहायला मिळते. सोशल मीडियावर दोघेही एकमेकांप्रती असलेलं प्रेम व्यक्त करत असतात. त्यांच्या फोटोंवरही लाईक्सचा वर्षाव असतो. लग्नानंतर जेनेलिया फारशी चित्रपटांमध्ये झळकली नाही. मात्र, रितेशच्या पाठीशी ती खंबीर उभी असते.