मुंबई - सैफ अली खान एकेकाळी आपल्या विनोदी भूमिकांमुळे ओळखला जात होता. मात्र, मध्यंतरी त्याने काही गंभीर भूमिका साकारल्या. आता पुन्हा एकदा तो त्याच्या विनोदी अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याचा 'जवानी जानेमन' हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे पहिल्या दिवशीच्या कमाईचे आकडेही समोर आले आहेत.
'जवानी जानेमन' या चित्रपटात सैफसोबत पूजा बेदीची मुलगी आलिया एफ आणि तब्बू यांची मुख्य भूमिका आहे. मात्र, पहिल्या दिवशी या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात झाली आहे.
हेही वाचा -'सूर्यवंशी' चित्रपटात अक्षय कुमार सोबत दिसणार जॅकी श्रॉफ
सैफचा विनोदी अंदाज या चित्रपटात पाहायला मिळणार म्हणून प्रेक्षकांना या चित्रपटाची आतुरता होती. मात्र, चित्रपटाचे पहिल्या दिवशीच्या कमाईचे आकडे पाहता, हा प्रतिसाद इतर चित्रपटांच्या तुलनेत कमी असल्याचा पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने ३.२४ कोटीची कमाई केली आहे. आठवड्याच्या शेवटपर्यंत या आकड्यांमध्ये आणखी भर पडेल, असे म्हटले जात आहे.
नितीन कक्कर यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती पूजा एंटरटेनमेंट आणि सैफच्या ब्लॅक नाईट फिल्म्स अंतर्गत करण्यात आली आहे.
'जवानी जानेमन' चित्रपटासोबतच हिमेश रेशमीयाचा 'हॅप्पी, हार्डी अँड हिर' हा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे दोन्ही चित्रपटांपैकी आता कोणता चित्रपट बाजी मारतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा -Public Review : हिमेश रेशमीयाचा 'हॅप्पी, हार्डी, अँड हिर' सिनेमागृहात दाखल, जाणून घ्या प्रतिक्रिया