मुंबई - कोरोना व्हायरस ही सर्वात मोठी महामारी घोषित करण्यात आले आहे. असे असताना दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये तबलिगी जमातचे २००० लोक जलसा साजरा करीत होते. या बातमीने प्रशासनाची झोप उडाली आहे. यात सहभागी होणाऱ्यांमध्ये मलेशिया, इंडोनेशिया, सऊदी अरब आणि किर्गिस्तान या देशांतील लोक होते.
अल्पसंख्यक आयोगाचे माजी अध्यक्ष ताहिर महमूदने दारूल उलूम देवबंदला सांगितले की, जोपर्यंत कोरोनाचे संकट संपत नाही तोपर्यंत सर्व मशिदी बंद ठेवण्याचा फतवा काढा. याबाबत ख्यातनाम गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी लगेचचआपले मत मांडले आहे.
जावेद अख्तर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ''महमूद साहब हे एक स्कॉलर आणि अल्पसंख्यक आयोगचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांनी जोपर्यंत कोरोनाचे संकट संपत नाही तोपर्यंत सर्व मशिदी बंद ठेवण्याचा फतवा काढण्यास सांगितले आहे. मी पूर्णपणे त्यांच्या मताशी सहमत आहे. काबा आणि मदिना मशिदी बंद आहेत तर भारतातील मशिदी का बंद केल्या जात नाहीत?''
जावेद अख्तर यांच्या या ट्विटचे खूप कौतुक होत आहे. तर दुसरीकडे काही लोक वेगळ्या दृष्टीकोनातून पाहात आहेत. या ट्विटवर लोक खूप कॉमेंट करीत आहेत आणि प्रतिक्रियाही देत आहेत.
निजामुद्दीन मरकजमध्ये सहभागी झालेल्या सहा लोकांचा हैदराबादमध्ये मृत्यू झाला आहे. या सर्व लोकांना कोरोना व्हायरसचे संक्रमण झाले होते. तर अंदमानमध्ये १० लोकाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. आतापर्यंत देशात ३२ लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.