मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांची प्रतिमा उजळ करण्यासाठीच 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाची निर्मिती झाल्याची चर्चा आता जोर धरु लागलीय. येत्या ५ एपिलला हा सिनेमा रिलीज केला जाणार आहे. होळीच्या दिवशी या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. त्यानंतर हा सिनेमा प्रचारकी थाटाचा असल्याचा आरोप सुरू झालाय. विशेष म्हणजे दिग्गज गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी आपल्या नावाचा उल्लेख पोस्टरवर झाल्यामुळे धक्का बसला असल्याचे म्हटलंय.
जावेद अख्तर यांनी ट्विट करुन आश्चर्य व्यक्त केलंय. सिनेमाच्या क्रेडीट लिस्टमध्ये गीतकार म्हणून जावेद अख्तर यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलाय. मात्र, त्यांनी यासाठी कोणतेही योगदान केलेले नव्हते.