मुंबई - बॉलिवूडचे ख्यातनाम गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी लाऊड स्पीकरवरुन अजान देण्याबाबत केलेल्या विधानामुळे नव्या वादाला जन्म मिळाला आहे. स्पीकरवरुन अजान देणे बंद केले पाहिजे. यामुळे लोकांना त्रास होतो, असे मत जावेद अख्तर यांनी व्यक्त केले आहे.
जावेद अख्तर यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, ''भारतात जवळपास ५० वर्षापर्यंत लाऊड स्पीकरवरुन अजान देणे हराम होते. त्यानंतर ते हलाल झाले आणि अशा प्रकारे हलाल झाली की त्याला कोणतीच सीमा नाही राहिली. अजान करणे ठिक आहे परंतु लाऊड स्पीकरवर हे करणे दुसऱ्यांसाठी अडचणीचे ठरते. यावेळी ते स्वतः करतील अशी अपेक्षा मी ठेवतो.''
या ट्विटनंतर जावेद अख्तर यांच्यावर ट्रोलर्सनी जोरदार हल्ला चढवला. सोशल मीडियावर ते वेगाने ट्रोल होत आहेत. एका युजरने कॉमेंटमध्ये लिहिलंय, ''लाऊड स्पीकरवरुन अजान बंद करण्याची भाषा करुन तुम्ही आपला सेक्यूलरीझम सिध्द करण्याची गरज नाही. बॅन करायचा असेल तर लाऊड स्पीकर पूर्णपणे बॅन केला पाहिजे. मग ते गणेश चतुर्थी असो की, रविवारी किंवा अन्य धार्मिक कार्यक्रमात. व्हिआयपी लग्नात होणाऱ्या आवाजालाही विसरता कामा नये.''