महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

हॉट विजय देवराकोंडासोबत झळकणार 'धडक' गर्ल, जान्हवीचे स्वप्न होतंय साकार - sridevi

जान्हवी कपूरने दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी तिचे आवडता अभिनेता आणि टॉलिवूडच नवा सुपरस्टार विजय देवराकोंडासोबत काम करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

विजय देवराकोंडा,जान्हवी कपूर

By

Published : Aug 17, 2019, 7:58 PM IST

मुंबई - दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. अजित कुमार यांच्या 'थला ६०' या चित्रपटात ती काम करणार असल्याची घोषणा झाली होती. आता तिला आणखी एक चित्रपटाची ऑफर मिळाली आहे. यावेळी तिचा आवडता अभिनेता आणि टॉलिवूडच्या नव्या सुपरस्टारसोबत काम करण्याचे तिचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

हे खरं आहे. तेलुगु माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार ख्यातनाम दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनी जान्हवीला आगामी चित्रपटाची ऑफर दिली आहे. 'अर्जुन रेड्डी' फेम अभिनेता विजय देवराकोंडा याच्यासोबत ती आता ऑनस्क्रिन रोमान्स करताना दिसेल.

विजय देवराकोंडा आगामी चित्रपटात पुरी जगन्नाथ दिग्दर्शित आणि चार्मी कौर निर्मित चित्रपटात काम करणार असल्याची अधिकृत घोषणा झाली होती. आता चार्मी यांनी ट्विटरवरुन जान्हवी कपूर या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.

विजय देवराकोंडा हा तेलुगु फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय हँडसम अभिनेता मानला जातो. कॉफी विथ करणच्या एका मुलाखतीत करणने जान्हवीला एक प्रश्न विचारला होता. कोणत्या अभिनेत्यासोबत काम करण्याची इच्छा आहे, असे तो प्रश्न विचारला होता. यावेळी जान्हवीने विजय देवराकोंडाचे नाव घेतले होते. तो हॉट आणि अॅट्रॅक्टिव्ह असल्याचे ती म्हणाली होती. या घोषणेमुळे तिचे हे स्वप्न पूर्ण होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details