मुंबई - हॉलिवूडचा प्रसिध्द चित्रपट 'टर्मिनेटर : डार्क फेट'ची चार पोस्टर्स रिलीज करण्यात आली आहेत. गेल्या महिन्यात चित्रपटाचा ट्रेलर आला होता. जगभरातील प्रेक्षकांनी त्याला जबरदस्त प्रतिसाद दिला होता. १ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची उत्कंठा आता वाढत चालली आहे.
'टर्मिनेटर : डार्क फेट'ची उत्कंठा वाढली, ट्रेलर पाठोपाठ आली नवी पोस्टर्स - लिंडा पॅमिल्टन
'टर्मिनेटर : डार्क फेट' चित्रपट १ नोव्हेंबरला भारतात सहा भाषेत रिलीज होणार आहे. गेल्या महिन्यात आलेल्या ट्रेलरने जगभर धमाल उडवली होती. आता सिनेमाची नवी पोस्टर्स रिलीज झाली आहेत.

'टर्मिनेटर : डार्क फेट'
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी या नवीन चार पोस्टरची पोस्ट शेअर केली आहे. यात अर्नॉल्ड शेवर्झेंग्गर ( टी -८०० च्या भूमिकेत ), लिंडा हॅमिल्टन ( साराह कोन्नोरच्या भूमिकेत ) , प्रगत मानवाच्या भूमिकेत मॅकेन्झी डेवीस आणि रहस्यमय डॅनी रामोस, हे पात्र नतालिया रेजने साकारले आहे.
'टर्मिनेटर : डार्क फेट' हा चित्रपट १ नोव्हेंबर रोजी सहा भाषांमध्ये रिलीज होणार आहे. इंग्रजी, हिंदी, तामिळ, तेलुगु, कन्नड आणि मळ्यालम या भाषेत हा सिनेमा रिलीज होईल.