मुंबई -जेम्स बॉन्डच्या सीरिजमधील २५ वा 'नो टाइम टू डाय' या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. अभिनेता डॅनियल क्रेग या सीरिजमुळे जेम्स बॉन्ड या नावानेच लोकप्रिय आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबत चाहते उत्सुक आहेत. सुरुवातीला हा चित्रपट ३ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. मात्र, आता एकदिवस आधीच हा चित्रपट सिनेमागृहात झळकणार आहे.
'नो टाइम टू डाय' हा चित्रपट ३ एप्रिल एवजी आता २ एप्रिलला भारतात प्रदर्शित होणार आहे. यांशिवाय हिंदी भाषेसोबतच हा चित्रपट इंग्रजी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्येही प्रदर्शित केला जाणार आहे. संपूर्ण आठवड्याचा चित्रपटाच्या कमाईसाठी फायदा व्हावा, यासाठी या चित्रपटाची नवी रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.
डॅनियलने २००६ साली 'कसिनो रॉयल' मधून 'जेम्स बॉन्ड'च्या सीरिजमध्ये एन्ट्री केली होती. त्यानंतर त्याने 'क्वांटम ऑफ सोलेस', 'स्कायफॉल' आणि 'स्पेक्ट्रम' यामध्ये जेम्स बॉन्डची भूमिका साकारली होती. 'स्कायफॉल' या सीरिजने ब्रिटनच्या बॉक्स ऑफिसवर बरेच विक्रम रचले होते.