वॉशिंग्टन - अमेरिकन गायक जॅक्सन ब्राऊन याला कोरोना व्हायरसचे संक्रमण झाले आहे. कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे त्याने दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.
मंगळवारी ऑनलाईन मीडियासोबत झालेल्या चर्चेत जॅक्सनने ताप आणि खोकला वाढल्यामुळे तपासणी केल्याचे सांगितले.
जॅक्सनचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. आपल्या आजाराच्या गंभीरतेबद्दल बोलताना म्हणाला, ''माझ्यातील लक्षणे थोडी कमी आहेत. त्यामुळे मला रुग्णालयात दाखल होण्याची किंवा औषधांची आवश्यकता नाही.''
लोकांना लक्षणे दिसली किंवा नाही दिसली तर घरात राहण्याचा इशारा देताना जॅक्सन म्हणाला, ''काही लोकांनी अजूनपर्यंत टेस्ट केलेली नाही. त्यांच्यात लक्षणे दिसत नाहीत परंतु त्यांच्यात असतील आणि ते इतरांनाही संक्रमित करतील. ही गोष्ट तरुणांना समजली पाहिजेत. याचा अर्थ असा की कुठेही जाऊ नका, कोणाला न भेटणे कोणाच्याही संपर्कात न येणे.''