मुंबई -अक्षय कुमारचा आगामी कॉप ड्रामा असलेला 'सूर्यवंशी' चित्रपटाची चाहत्यांना फार आतुरता आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, कॅटरिना कैफ यांची जोडी झळकणार आहे. अजय देवगन आणि रणवीर सिंग यांचीदेखील भूमिका पाहायला मिळणार आहे. आता यामध्ये अभिनेता जॅकी श्रॉफ यांचीही एन्ट्री झाली आहे.
रोहित शेट्टीने इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे. याशिवाय आणखी एक सरप्राईझ बाकी असल्याचे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा -करिना कपूरच्या शोमध्ये 'दंबग गर्ल'ची धमाकेदार एन्ट्री, पाहा व्हिडिओ