महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'लाईफ बियॉन्ड रिल' - जयललिता : सौंदर्यवती अभिनेत्री ते 'द आर्यन लेडी'पर्यंतचा प्रवास - jaylalitha latest news

आयुष्यात एखादं वळण असं येत असतं, ज्याचा आपण कधीही विचारही केला नसेल. जे. जयललिता यांचं उदाहरण यासाठी चपखल ठरेल. त्या आपल्या काळातील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. असं असताना त्यांनी राजकीय क्षेत्रातही आपला दमदार ठसा उमटवला.

J. Jayalalithaa: Reticent child who turned to be 'The Iron Lady'
'लाईफ बियॉन्ड रिल' - जयललिता : सौंदर्यवती अभिनेत्री ते 'द आर्यन लेडी'पर्यंतचा प्रवास

By

Published : Dec 3, 2019, 3:08 PM IST

असं म्हटलं जातं की, प्रत्येक चमकणाऱ्या डोळ्यांमध्ये बलिदान आणि जिद्दीच्या हजारो कथा दडलेल्या असतात. सर्वांसमोर आत्मविश्वासाने वावरणारी अभिनेत्री, यशस्वी आयुष्य असं स्वप्न न पाहणारं कदाचित कोणीही नसेल. मात्र, आयुष्यात एखादं वळण असं येत असतं, ज्याचा आपण कधीही विचारही केला नसेल. जे. जयललिता यांचं उदाहरण यासाठी चपखल ठरेल. त्या आपल्या काळातील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. असं असताना त्यांनी राजकीय क्षेत्रातही आपला दमदार ठसा उमटवला.



एक निर्मळ मनाची मुलगी जिने कधीकाळी निर्दयी जगाला त्रासुन आत्महत्या करण्याचा निर्णयही घेतला होता. त्याच एकदिवशी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री बनुन सर्वात प्रभावी व्यक्तीमत्व ठरल्या. विधानसभा अध्यक्षांसमोरच जयललिता यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. हा हल्ला त्यावेळी मुख्यमंत्री असलेले करुणानिधी यांच्या आडून सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी घडवून आणला होता. मात्र, तरीही त्यांनी या परिस्थितीचा मोठ्या हिमतीने सामना केला.

जयललिता



जयललिता यांच्या बालपणाबाबत सांगायचं तर, त्या लहानपणी त्या खूप लाजाळू होत्या. अनोळखी व्यक्तींशी बोलणंही त्या टाळायच्या. त्यांची आईदेखील अभिनय क्षेत्रात होती. त्यामुळे त्या वयाच्या ६ - १० वर्षापर्यंत आपल्या आजी - आजोबांकडे राहत होत्या. त्यांना सुरुवातीला अभिनय क्षेत्राची आवड नव्हती. मात्र, घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांनाही यामध्ये पाऊल ठेवावे लागले.

जयललिता



जसा काळ गेला तशा त्या अधिक कणखर बनत गेल्या. जवळपास १४ वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. राजकिय कारकिर्दितही त्यांना बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागला. तरीही त्या निडरपणे सर्व गोष्टींना सामोऱ्या गेल्या. जेव्हा त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, तेव्हा मोठ्या संख्येने नागरिक त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले.

जयललिता



६८ व्या वर्षी जयललिता यांच्या निधनानंतर राज्यात शोककळा पसरली होती. निधनानंतरच्या जनआक्रोशाला सांभाळण्यासाठी पोलिसांची दमछाक झाली होती. त्यांच्या निधनाचं वृत्त समजताच नागरिकांनी आक्रोश केला. जयललिता यांनी जनमानसात निर्माण केलेली ही एक प्रतिमाच होती. त्यांनी नागरिकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं होतं. त्यामुळेच त्यांच्या निधनानंतर जनतेला सांभाळणं कठीण झालं होतं. अभिनेत्री म्हणून तर त्या लोकप्रिय होत्याच मात्र, राजकिय नेत्या म्हणूनही त्यांनी आपला अमिट असा ठसा उमटवला.

जयललिता



जयललिता यांच्या बालपणीचा संघर्ष, राजकिय कारकिर्द या सर्व गोष्टी त्यांच्यावर आधारित बायोपिक 'थलायवी'मध्ये पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री कंगना रनौत त्यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. ए. एल. विजय या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. पुढच्या वर्षी २० फ्रेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदीसोबतच तमिळ आणि तेलुगू भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

जयललिता

(या आठवड्यात 'ई - टीव्ही भारत सितारा' या भागात 'लाईफ बियॉन्ड रिल' या शिर्षकाखाली वेगवेगळ्या व्यक्तींच्या पडद्यामागच्या कथा सादर करण्यात येणार आहे.)

ABOUT THE AUTHOR

...view details