मुंबई - 'मैनें प्यार किया' चित्रपटामुळे लोकप्रियतेच्या कळसावर पोहोचलेली अभिनेत्री भाग्यश्री गेली दशकभर रुपेरी पडद्यापासून दूर आहे. आता ती बॉलिवूडमध्ये परतण्यासाठी सज्ज झाली आहे. प्रभाससोबत आगामी चित्रपटात ती झळकेल. यातील तिची व्यक्तीरेखा सरप्राईज पॅकेज असल्याचे तिने सांगितले.
प्रभाससोबत सिनेमा करतीय भाग्यश्री, 'सरप्राईज पॅकेज' असल्याचा केला खुलासा - Bhagyashri in Prabhas upcoming film
अभिनेत्री भाग्यश्री तब्बल दशकानंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. बाहुबली फेम प्रभाससोबत आगामी चित्रपटात काम करत असल्याचे तिने सांगितले. यातील व्यक्तीरेखेबद्दलही तिने यावेळी सांगितले.
![प्रभाससोबत सिनेमा करतीय भाग्यश्री, 'सरप्राईज पॅकेज' असल्याचा केला खुलासा Bhagyashri on role in Prabhas upcoming film](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6186859-thumbnail-3x2-oo.jpg)
प्रभाससोबत सिनेमा करतीय भाग्यश्री
भाग्यश्रीच्या हातात आता तीन चित्रपट आहेत. 'किटी पार्टी', 2 स्टेट्सचा तेलुगू रिमेक आणि प्रभासच्या आगामी चित्रपटात ती काम करणार आहे.
भाग्यश्री म्हणाली, ''प्रभासचा २० वा चित्रपट एक सरप्राईज पॅकेज आहे. प्रत्येक चित्रपटात एक नवीन भाग्यश्री पाहायला मिळेल. कारण वेगवेगळ्या व्यक्तीरेखा साकारायला मला आवडते.''