मुंबई- दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणात नामांकित बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला अडकवण्यात आले होते. अलिकडे रियाने इन्स्टाग्रामवर पोस्टमध्ये प्रेमाच्या शक्तीविषयी लिहिले आहे. ती 'साँड की आँख' या चित्रपटाची निर्माती निधी परमार हिरानंदानीसोबत एका फोटोमध्ये दिसते. त्यामुळे निधी यांच्या आगामी चित्रपटात ती झळकणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
रियाने रविवारी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये ती निधी हिरानंदानीसोबत दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लव्ह इज पॉवर असे लिहिले आहे. ‘प्रेम असी प्रकारचे विणलेले कापड आहे जे कधीच क्षीण होत नाही. कितीही वेळा संकटे आली आणि दुःखाच्या पाण्यात धुतले तरी काहीच फरक पडत नाही', असे ख्यातनाम अमेरिकन लेखक रॉबर फुलघम यांच्या कोटचा वापर तिने आपल्या पोस्टमध्ये केलाय.