मुंबई -'अर्जुन रेड्डी' फेम विजय देवरकोंडा हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा हँडसम हंक म्हणून ओळखला जातो. त्याची लोकप्रियता देखील मोठ्या प्रमाणात आहे. खास करुन तरुणींमध्ये त्याची मोठ्या प्रमाणावर क्रेझ पाहायला मिळते. मात्र, अलिकडेच विजयचा एका तरुणीसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे तो प्रेमात पडलाय का, असा प्रश्न तरुणींना पडला आहे.
अभिनेत्री इझाबेला लिटे हिने अर्जुनसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. दोघेही लवकरच दिग्दर्शक क्रांती माधव यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहेत. फ्रान्समध्ये या चित्रपटाचे शूटिंग करण्यात येणार आहे.
इझाबेला आणि अर्जुनच्या या फोटोवर चाहत्यांच्यादेखील भरभरुन प्रतिक्रिया येत आहेत.
इझाबेलाने तेलुगू आणि हिंदी दोन्हीही चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तलाश, सिक्सटीन, पुरानी जिन्स, नरेंद्र आणि मी. मंजू, अशा चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत.
इझाबेला मुळची ब्राझिलची आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत तिचे नाव जोडले गेले होते. त्यामुळे ती चर्चेत आली होती.
तर, विजयचेही बऱ्याच अभिनेत्रींसोबत नाव जोडले गेले. लवकरच तो 'डिअर कॉम्रेड' या चित्रपटात झळकणार आहे. २६ जुलै रोजी त्याचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.