महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

इरफान खानच्या 'अंग्रेजी मीडियम'ची तारीख जाहीर, 'या' दिवशी होणार प्रदर्शित - hindi medium sequel

'अंग्रेजी मीडियम' हा चित्रपट 'हिंदी मीडियम'चा सिक्वेल आहे. या चित्रपटा करिना कपूर खानदेखील झळकणार आहे. दोघेही एकत्र या चित्रपटात दिसणार असल्यामळे चाहत्यांनाही या चित्रपटाची आतुरता आहे.

'अंग्रेजी मीडियम' चित्रपटाची तारीख जाहीर

By

Published : Sep 20, 2019, 10:20 AM IST

मुंबई -बॉलिवूड अभिनेता इरफान खान कॅन्सरवर उपचार घेऊन भारतात परतला आहे. बऱ्याच काळापासून तो पडद्यापासून दुर होता. मात्र, आता तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याच्या आगामी 'अंग्रेजी मीडियम' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये तो सध्या व्यग्र आहे. अलिकडेच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

'अंग्रेजी मीडियम' हा चित्रपट 'हिंदी मीडियम'चा सिक्वेल आहे. या चित्रपटा करिना कपूर खानदेखील झळकणार आहे. दोघेही एकत्र या चित्रपटात दिसणार असल्यामळे चाहत्यांनाही या चित्रपटाची आतुरता आहे. पुढच्या वर्षी २० मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

होमी अदजानिया हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. करिना कपूर आणि इरफान खान व्यतिरिक्त डिंपल कपाडिया आणि राधिका मदन या दोघीही या चित्रपटात झळकणार आहेत.

हेही वाचा -'एमी अवार्ड्स २०१९': 'सेक्रेड गेम्स' आणि 'लस्ट स्टोरीज'ला मिळालं नॉमिनेशन

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाबद्दलची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.

करिना कपूर या चित्रपटा महिला पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तर, राधिका मदन ही इरफान खानच्या मुलीच्या भूमिकेत दिसेल. इरफान खान चंपक नावाचं पात्र साकारणार आहे. त्यानेही त्याचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला होता.

हेही वाचा -सुनील ग्रोव्हरने 'द कपिल शर्मा शो'त परतण्याबद्दल सौडले मौन, चाहते मात्र नाराज

ABOUT THE AUTHOR

...view details