लॉस ऐंजेलिस -'मार्व्हल'चा 'अॅव्हेन्जर्स ऐन्डगेम' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत त्सुनामी लाट घेऊन प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वीच कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अब्जो रुपयांची कमाई केली आहे. भारतातही या चित्रपटाचे लाखो चाहते आहेत. भारतातील बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने आत्तापर्यंत २१५.८० कोटींची कमाई केली आहे. मात्र, या चित्रपटाचा हुकूमी एक्का असलेला 'आर्यनमॅन' म्हणजे रॉबर्ट डाऊनी याला या चित्रपटासाठी सर्वाधिक मानधन मिळाले आहे.
अॅव्हेन्जर्सचा 'आर्यनमॅन' ठरला जगातील सर्वात महागडा अभिनेता; ऐन्डगेमसाठी मिळाले इतक्या कोटींचे मानधन - box office
या चित्रपटाचा हुकूमी एक्का असलेला 'आर्यनमॅन' म्हणजे रॉबर्ट डाऊनी याला या चित्रपटासाठी सर्वाधिक मानधन मिळाले आहे.
रॉबर्ट डाऊनीच्या लोकप्रियतेमुळे माव्हर्लचे यापूर्वूीचे २२ चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. त्यामुळे 'अॅव्हेन्जर ऐन्डगेम'साठी त्याला तब्बल ५२४ कोटींचे मानधन देण्यात आले आहे. भारतात सर्वात महागडा चित्रपट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'बाहुबली' या चित्रपटाच्या संपूर्ण खर्चापेक्षा जास्त हा आकडा असल्याचे बोलले जात आहे.
एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, रॉबर्ट डाऊनी याने माव्हर्लच्या सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये स्व:ताचे पैसे गुंतवले होते. त्यामुळे त्याच्या मदतीची परतफेड करण्यासाठी 'मार्व्हल्स' कडुन त्याला इतके मानधन देण्यात आले आहे.
आता 'अॅव्हेन्जर्स ऐन्डगेम'मध्येही त्याच्या भूमिकेची चाहत्यांमध्ये क्रेझ पाहायला मिळते. 'आर्यनमॅन' हे पात्र चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतले आहे. त्यामुळे आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आणखी कोणते विक्रम रचतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.