महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

RRR In AP : आंध्रातील प्रेक्षकांचा नादखुळा : सिनेमा थिएटरमध्ये लोखंडी खिळे आणि काटेरी कुंपण

आंध्र प्रदेशमध्ये श्रीकाकुलम शहरामधील सूर्या महल थिएटरने स्क्रीनवर कोणी जाऊ नये म्हणून कुंपण लावले आहे. रसिकांच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी आणि पडद्यावर गर्दी होऊ नये म्हणून हे करण्यात आल्याचे थिएटरचे व्यवस्थापक धनमबाबू यांनी सांगितले.

सिनेमा थिएटरमध्ये लोखंडी खिळे
सिनेमा थिएटरमध्ये लोखंडी खिळे

By

Published : Mar 26, 2022, 12:57 PM IST

विजयवाडा - बहुप्रतिक्षित अॅक्शन ड्रामा चित्रपट 'RRR' देशभर २५ मार्च रोजी रिलीज झाला. या चित्रपटाला आंध्र प्रदेशमध्ये प्रचंड गर्दी होताना दिसत आहे. राम चरण आणि ज्यू. एनटीआर यांची प्रचंड लोकप्रियता इथे पाहायला मिळते. या अभिनेत्यांची पडद्यावर जेव्हा एन्ट्री होते तेव्हा पडद्याजवळ मोठी गर्दी त्यांचे फॅन्स करतात. म्हणूनच आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील श्रीकाकुलममधील एका चित्रपटगृहाने प्रेक्षकांना पडद्याजवळ जाण्यापासून रोखण्यासाठी काटेरी तारा आणि कुंपण घातले आहे.

यापूर्वी ‘पुष्पा’ चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी प्रशासनाला चाहत्यांकडून अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. या चित्रपटात राम चरण, ज्युनियर एनटीआर, आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्याही भूमिका आहेत. एसएस राजामौली दिग्दर्शित हा चित्रपट देशभर लोकप्रिय बनला आहे.

श्रीकाकुलममधील सूर्या महल थिएटरने स्क्रीनवर कोणी जाऊ नये म्हणून कुंपण (कुंपण) लावले आहे. रसिकांच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी आणि पडद्यावर गर्दी होऊ नये म्हणून हे करण्यात आल्याचे थिएटरचे व्यवस्थापक धनमबाबू यांनी सांगितले. विजयवाडा येथील अन्नपूर्णा थिएटरमधील स्क्रीनवर चाहत्यांची गर्दी होऊ नये म्हणून प्लायवूडच्या बोर्डवर खिळे ठोकण्यात आले होते आणि पडद्याजवळ ठेवण्यात आले होते.

इतर काही चित्रपटगृहांमध्येही पडद्याभोवती कुंपण लावण्यात येत आहे. अन्नपूर्णा थिएटरच्या मालकांनी प्लायवूडवर खिळे असलेल्या फलकांचे फोटो पोस्ट केल्यानंतर ट्विटरवर व्हायरल झाले. चित्रपट पाहण्यासाठी येणाऱ्या रसिकांनी कोणत्याही सीमारेषेशिवाय चित्रपटाचा आनंद घ्यावा, अशी थिएटर आयोजकांची इच्छा आहे.

हेही वाचा -Prakash Raj Birthday: सडेतोड भाष्य करणारा अष्टपैलू अभिनेता प्रकाश राज

ABOUT THE AUTHOR

...view details