मुंबई - बॉलिवूडची 'क्विन' कंगना रनौत लवकरच जयललिता यांच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचं शिर्षक तमिळमध्ये 'थलायवी' तर, हिंदीमध्ये 'जया' असे असणार आहे. जयललिता यांचा लूक साकारण्यासाठी कंगना सध्या लॉस ऐंजेलिस येथे गेली आहे. हा लूक साकारण्यासाठी कशाप्रकारे मेहनत घ्यावी लागतेय, याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
हॉलिवूडचे सुप्रिद्ध मेकअप आर्टिस्ट जेसन कोलिन्स हे कंगनाच्या लूकवर मेहनत घेत आहेत. त्यांनी यापूर्वी 'कॅप्टन मार्व्हल', 'ब्लेड रनर २०४९' आणि 'हंगर गेम्स' यांसारख्या चित्रपटांसाठी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केले आहे. आता ते जयललिता यांच्या बायोपिकचा लूक तयार करत आहेत.
हेही वाचा -IIFA Awards 2019: ग्रीन कार्पेटवर बॉलिवूड कलाकारांचा जलवा