न्यूयॉर्क - हंगेरियन अभिनेत्री मरीना गेरा हिने ४७ व्या आतंरराष्ट्रीय एमी अवार्ड्स सोहळ्यात राधिका आपटेला मात देऊन उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आपल्या नावी केला आहे. 'ओरोक टेल' या चित्रपटासाठी तिला हा पुरस्कार मिळाला आहे.
'एमी पुरस्कार २०१९' साठी राधिका आपटेला 'लस्ट स्टोरीज' या वेबसीरिजसाठी नामांकन मिळाले होते. याशिवाय नवाजुद्दीन सिद्दिकी आणि सैफ अली खान यांना 'सेक्रेड गेम्स'साठी नामांकन मिळाले होते. मात्र, 'सेक्रेड गेम्स' देखील या पुरस्कार सोहळ्यात बाजी मारू शकला नाही. 'मैकमाफिया' या सीरिजने 'सेक्रेड गेम्स'ला मात देऊन सर्वोत्कृष्ट ड्रामा सीरिजचा पुरस्कार मिळवला आहे.
ऑस्ट्रेलियन सीरिज 'सेफ हार्बर' या मिनीसीरिजने नॉन स्क्रिप्टेड मनोरंजन या श्रेणीमध्ये पुरस्कार मिळवला. तर, ब्राझिलच्या 'हॅक इन द सिटी' या शॉर्ट फिल्मनेही या पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली आहे.
१. आर्ट्स प्रोग्राम -
Dance or Die
Witfilm / NTR
Netherlands