मुंबई- नावापासूनच चर्चेत आलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी चित्रपटाचे टीजर पोस्टर लाँच करण्यात आले आहे. या चित्रपटामध्ये गिरीश कुलकर्णी आणि सयाजी शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एप्रिल २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
आगळेवेगळे नाव असलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरवरून चित्रपट अतिशय धमाल आणि मनोरंजक असणार असा अंदाज बांधण्यात येत आहे. 'कोल एलएलपी'तर्फे या चित्रपटाची प्रस्तुती करण्यात आली आहे. तर, 'फटमार फिल्म्स एलएलपी'च्या नेहा गुप्ता आणि प्रसाद नामजोशी यांनी ब्लिंक मोशन पिक्चर्स, अभिषिक्ता इन्फोटेन्मेंट प्रा. लि.आणि कोल फिल्म्सचे संकेत बियाणी, संदेश बियाणी, विकास वोहरा, सुशील कंठेड, रितेश चितलांगिया यांच्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.