महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

शस्त्रांशिवाय घडणार सर्जिकल स्ट्राईक, 'इंडियाज मोस्ट वान्टेड' प्रदर्शनासाठी सज्ज - pm modi

भारतावर होणाऱ्या हल्ल्यात अनेक निष्पापांचे जाणारे जीव थांबवण्यासाठी ५ लोकांच्या टीमने उचलेलं पाऊल आणि सर्वात क्रुर गुन्हेगार ओसामाला पकडण्यासाठी कोणत्याही हत्यारांविना चाललेली या टीमची धडपड, या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.

शस्त्रांशिवाय घडणार सर्जिकल स्ट्राईक, 'इंडियाज मोस्ट वान्टेड' प्रदर्शनासाठी सज्ज

By

Published : May 21, 2019, 12:38 PM IST

मुंबई -अभिनेता अर्जून कपूर लवकरच 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शि झाला, ज्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचं नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

भारतावर होणाऱ्या हल्ल्यात अनेक निष्पापांचे जाणारे जीव थांबवण्यासाठी ५ लोकांच्या टीमने उचलेलं पाऊल आणि सर्वात क्रुर गुन्हेगार ओसामाला पकडण्यासाठी कोणत्याही हत्यारांविना चाललेली या टीमची धडपड, या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. त्यामुळेच या पोस्टरवर शस्त्रांशिवाय होणार 'सर्जिकल स्ट्राईक', असे लक्षवेधी कॅप्शन दिले आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी हे पोस्टर शेअर केले आहे.

'इंडियाज मोस्ट वान्टेड'चं नवं पोस्टर

या चित्रपटाचे दिग्दर्शन राज कुमार गुप्ता यांनी केले आहे. तर फॉक्स स्टार स्टुडिओज अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. २४ मे २०१९ ला हा चित्रपट चित्रपटगृहात झळकणार आहे. याच दिवशी पंतप्रधान मोदी यांच्या जीवनावर आधारित पी.एम.मोदी आणि इशा गुप्ताचा 'वन डे' हे चित्रपटही प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे या तिनही चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर शर्यत पाहायला मिळेल.

ABOUT THE AUTHOR

...view details