तामिळनाडू -दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकली आहे. यामध्ये सुमारे ३८ ठिकाणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये सुमारे ६५ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. विजयसोबतच निर्माते अंबू चेलियन (Anbu Chezhian) यांच्याही घरावर आयकर विभागाने धाड टाकली आहे.
तमिळ अभिनेता विजयच्या घरावर आयकर विभागाची धाड, ६५ कोटी रुपयांची वसुली - तमिळ अभिनेता थलापती विजय
विजयसोबतच निर्माते अंबू चेलियन (Anbu Chezhian) यांच्याही घरावर आयकर विभागाने छा़ड टाकली आहे.
तमिळ अभिनेता विजयच्या घरावर आयकर विभागाची धाड, ६५ कोटी रुपयांची वसुली
बुधवारी (५ फेब्रुवारी) आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी विजयची चौकशी केली होती. त्याच्या आगामी 'मास्टर्स' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ही चौकशी करण्यात आली होती.
अंबू चेलियन यांच्या 'एजीएस' सिनेमा अंतर्गत विजयने 'बिगिल' चित्रपटात भूमिका साकारली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.
Last Updated : Feb 6, 2020, 1:10 PM IST