महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

गोव्यातील ५० व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीव्हलची रंगारंग सुरुवात

आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीव्हल ऑफ इंडियाच्या ५० व्या सोहळ्याला गोव्यात सुरूवात झाली. आजपासून पुढील आठदिवस हा उत्सव रंगणार आहे. जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांचे रसग्रहण प्रेक्षक करणार आहेत.

फिल्म फेस्टीव्हलची रंगारंग सुरूवात

By

Published : Nov 20, 2019, 6:30 PM IST


आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीव्हल ऑफ इंडियाच्या ५० व्या सोहळ्याचे उद्घाटन अत्यंत उत्साहात पार पडले. जगभरातून आलेले दिग्गज कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि रसिक प्रेक्षक यांच्या उपस्थितीत हा रंगारंग फेस्टीव्हल सुरू झालाय. उद्घाटनानंतर ख्यातनाम गायक शंकर महादेवन यांचे सुश्राव्य गायन रसिकांना मंत्रमुग्ध करुन गेले.

यासोहळ्याला अमिताभ बच्चन, रमेश सिप्पी, किरण शांताराम, मधुर भांडारकर, प्रसून जोशी यांच्यासह दिग्गज बॉलिवूडकरांची उपस्थिती आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी बजावणाऱ्या जगभरातील दिग्गजांचा सन्मान यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना जावडेकरांनी यापुढे भारताच्या कोणत्याही राज्यात शूटींग करण्यासाठी जगभरातील सिने निर्मात्यांना परवानग्यासाठी ताटकळावे लागणार नसल्याचे सांगितले.

यासोहळ्यात मोठे आकर्षण होते दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचे. त्यांनी आजवर भारतीय चित्रपटसृष्टीत केलेल्या योगदानाबद्दल फेस्टीव्हलमध्ये गोल्डन आयकॉन पुरस्काराने सत्कार करण्यात आला. यावेळी अमिताभ यंच्यासह दिग्गजांची उपस्थिती मंचावर होती. या सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रसिध्द दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर यांनी केलं.

ABOUT THE AUTHOR

...view details