महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सलमान खानच्या आवाजातील 'दबंग 3'चं पहिलं गाणं प्रदर्शित - sonakshi sinha in Dabangg 3 song

सलमान खानने त्याचं पहिलं गाणं 1999 साली आलेल्या 'हॅलो ब्रदर' या चित्रपटात गायलं होतं. त्यानंतर त्याने 'किक', 'हिरो' आणि 'नोटबुक' यांसारख्या चित्रपटात गाणी गायली आहेत.

सलमान खानच्या आवाजातील 'दबंग 3'चं पहिलं गाणं प्रदर्शित

By

Published : Nov 10, 2019, 5:10 AM IST

मुंबई -बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याची अभिनयासोबतच असलेली गायनाची आवड सर्वांनाच माहिती आहे. त्याने त्याच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये स्वत: गाणी गायली आहेत. त्याचा आगामी 'दबंग 3' हा चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटात तो सोनाक्षी सिन्हा आणि सई मांजरेकर या दोन्ही अभिनेत्रींसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. आता सलमान खानच्या आवाजातील पहिलं गाणं देखील प्रदर्शित करण्यात आलं आहे.

सलमान खानने त्याचं पहिलं गाणं 1999 साली आलेल्या 'हॅलो ब्रदर' या चित्रपटात गायलं होतं. त्यानंतर त्याने 'किक', 'हिरो' आणि 'नोटबुक' यांसारख्या चित्रपटात गाणी गायली आहेत.

'दबंग 3'च्या पहिल्या गाण्यातही त्याच्या आवाजाची जादु पाहायला मिळते. या गाण्यात त्याची आणि सोनाक्षीची रोमॅन्टिक केमेस्ट्री दिसून येते. या चित्रपटात तो चुलबुल पांडे ही भूमिका साकारत आहे. तर, सोनाक्षी त्याच्या पत्नीच्या रज्जोच्या भूमिकेत दिसणार आहे.या गाण्याला सलमान खानसोबतच पायल देव या गायिकेचा आवाज लाभला आहे. तर, साजिद - वाजिद यांच्या जोडीने या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे. या जोडीने आजवर सलमानच्या चित्रपटांसाठी सुपरहिट संगीताची निर्मिती केली आहे.प्रभू देवा यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 20 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details